
सोलापूर, 2 नोव्हेंबर (हिं.स.)। भविष्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा व भीमा परिवार मिळवून लढवणार आहे. यापूर्वी साथ दिलेल्यानांही सोबत घेणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकी बाबत आपली भूमिका खासदार महाडिक स्पष्ट करीत होते. अद्याप कोणत्याही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही, त्यामुळे नेमका काय निर्णय घ्यायचा हे अद्याप ठरले नाही. मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच त्या प्रक्रियेला वेग येणार आहे.मात्र कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी निवडणुका लढविणारच असा ठाम निर्धार खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, गेल्या वेळेची परिस्थिती वेगळी होती यावेळी वेगळी आहे. आघाड्या व समविचारी आघाड्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान माजी आमदार राजन पाटील हे भाजप मध्ये आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड