परभणी : महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपा महानगरतर्फे आंबेडकरांना अभिवादन
परभणी, 6 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपा परभणी महानगरतर्फे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्
महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजप महानगरतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन


परभणी, 6 डिसेंबर (हिं.स.)।

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपा परभणी महानगरतर्फे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन अर्पण केले.

या प्रसंगी डॉ. केदार खटिंग, प्रशांत सांगळे, सचिन आंबिलवादे, भालचंद्र गोरे, उमेश शेळके, विजय गायकवाड, संजय रिझवानी, एम. डी. गौस, प्रवीण गायकवाड, रामा शिंदे, मंगलताई मुदगलकर, रमाताई शेजावळे, ऋतुजा जोशी, प्रभावती अन्नपूर्वे, अक्षय अन्नपूर्वे, सुरज चोपडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. आंबेडकरांच्या योगदानाचे स्मरण करत उपस्थित मान्यवरांनी सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या त्यांच्या विचारांचे आजही समाजाला मार्गदर्शन करणारे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रम शांत, श्रद्धापूर्ण वातावरणात पार पडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande