नाशिक - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भाजपातर्फे अभिवादन
नाशिक, 6 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलित, दीनदुबळ्यांचे कैवारी भारतरत्न,महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाणदिना निमित्त भाजपा प्रदेश मुख्य सह प्रवक्ते अजित चव्हाण,लक्ष्मण सावजी, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष रा
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भाजपातर्फे अभिवादन...


नाशिक, 6 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलित, दीनदुबळ्यांचे कैवारी भारतरत्न,महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाणदिना निमित्त भाजपा प्रदेश मुख्य सह प्रवक्ते अजित चव्हाण,लक्ष्मण सावजी, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राकेश दोंदे, भाजपा सरचिटणीस शाम बडोदे, प्रियंका राकेश दोंदे, अनु.जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश कांबळे, अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस कुंदन खरे यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करुन भिक्शु धम्मपाल इंगोले यांनी त्रिशरण पंचशील, बुध्द पुजा वंदना व भिम स्मरण,भीम स्तुती करून विधी संपन्न केला.

याप्रसंगी माजी नगरसेवक शरद मोरे,गजानन रनबावळे, कविता तेजाळे, सुजाता करंजीकर, राजीव मोरे, लक्ष्मण पगारे,दशरथ गांगुर्डे,बंटी नेवारे, ॲड.परमानंद पाटील,योगेश मोरे, ज्योती कवर, रोहिणी दळवी, अनिता भामरे, मदन निकम, अनिल मोरे, माजी नगरसेविका पुनम सोनवणे,अरिफ काझी,उत्तम काळे ,उदय जोशी ,राजेंद्र जडे सुनील पनीकर, दिगंबर पवार, बापु डापसे, सोनल दगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande