
सोलापूर, 6 डिसेंबर (हिं.स.) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीतर्फे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
यावेळी प्रदेश सचिव ॲड. संजीव सदाफुले, आप्पासाहेब लोकरे, जिल्हा अध्यक्ष बबलू गायकवाड, शहर अध्यक्ष देवा उघडे, प्रदेश मुस्लिम भाईचारा संयोजक रशिद सरदार, शहर युवक अध्यक्ष अमर साळवे, शहर प्रभारी सुहास सुरवसे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष इंद्रजीत वाघमारे, शहर उपाध्यक्ष इरफान मैंदर्गी, शहर सचिव मिनाज शेख, शहर उत्तर महासचिव जालिंदर मसलखांब, शहर उत्तर प्रभारी नितीन क्षीरसागर तसेच सचिन तुळसे, रोहन बनसोडे, राजु सुरवसे, अतिश वाघमारे, सचिन गायकवाड उपस्थित होते.कार्यक्रमात बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करून सर्वांनी सामाजिक न्याय, बंधुता आणि संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा जपण्याचा संकल्प केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड