
जळगाव , 6 डिसेंबर (हिं.स.) अमळनेर पारोळा रस्त्यावर एका धावत्या व्हॅनला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, अग्निशमन दलाचे जवान वेळेत घटनास्थळी दाखल झाल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि एक मोठा अनर्थ टळला.प्रवाशांना घेऊन जाणारी ही व्हॅन क्र. एमपी ०९ बीए ८८६१ ही अचानक धुराने भरली आणि त्यानंतर काही क्षणातच व्हॅनच्या इंजिनजवळून आगीच्या ज्वाला दिसू लागल्या. व्हॅनच्या चालकाने प्रसंगावधान राखून लगेच गाडी थांबवली आणि सर्व प्रवाशांना त्वरित बाहेर काढले, ज्यामुळे मोठी हानी टळली.ही घटना पारोळा रस्त्यावर खोकरपाट फाट्यावर घडली. वाहनातील चालक आणि प्रवासी तातडीने खाली उतरले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला संपर्क साधला.माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या घटनेत व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र अग्निशमन दलाच्या वेळेत केलेल्या कार्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी व फायरमन दिनेश बिऱ्हाडे, आकाश संदानशीव, जफर पठाण यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाने तातडीने आग नियंत्रणात आणली. वाहन गॅसवर असल्याने अचानक आग लागताच वाहने रस्त्यावरच थांबली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर