
धुळे, 6 डिसेंबर (हिं.स.) | धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभे तर्फे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आयुष्यमान प्रभाकरजी निकुभे आयुष्यमान शिवाजी मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व त्रिसरण पंचशील घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी धुळे जिल्हाभारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेब देविदास जगताप, जिल्हा अध्यक्ष सुनंद भामरे, सतीश भीमराव बोरसे , मुख्य संघटक मधुकर निकुंभे,कैलास बाविस्कर , डॉ. प्रभाकर निकुंबे, अशोक थोरात, शिवाजी मोरे,धुळे शहराध्यक्ष शशिकांत आप्पा देवरे ,नानासाहेब मोरे, के .जी .सैंदाणे धुळे तालुका अध्यक्ष मगन साळवे, राजेश ओहळ आणि आदी तसेच यश सिद्धी ग्रुप महार रेजिमेंटचे माजी सैनिक भीमराव बोरसे, रविकांत खंडारे, रोहिदास बैसाणे, रतन शिरसाठ इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर