डोंबिवली - 21 वा अखिल भारतीय आगरी महोत्सव १२ ते १९ डिसेंबर दरम्यान
डोंबिवली, 6 डिसेंबर, (हिं.स.)। २१ वा अखिल भारतीय महोत्सव शुक्रवार १२ ते १९ डिसेंबर या कालावधीत श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवाचा उद्‌घाटन सोहळा भारतीय क्रिकेट संघाचे कसोटी क्रिकेटवी
आगरी युथ फोरम आयोजित 21 वा अखिल भारतीय आगरी महोत्सव


डोंबिवली, 6 डिसेंबर, (हिं.स.)। २१ वा अखिल भारतीय महोत्सव शुक्रवार १२ ते १९ डिसेंबर या कालावधीत श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व येथे संपन्न होणार आहे.

या महोत्सवाचा उद्‌घाटन सोहळा भारतीय क्रिकेट संघाचे कसोटी क्रिकेटवीर निलेश कुलकर्णी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते व आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ सामाजिक नेते दशरथ पाटील, माजी केंद्रीय मंत्री, वनमंत्री गणेश नाईक, खासदार सुरेश म्हात्रे (बाल्या मामा),माजी संजय दिना पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार 12 तारखेला सायंकाळी साडे पाच वाजता संपन्न होणार आहे. या उदघाटन सोहळ्यासाठी समाजातील ज्येष्ठ नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती गुलाब वझे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठाणे रायगडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा निष्काम भावनेने प्रसार-प्रचार करणारे वैराग्यशील व्यक्तिमत्व श्रीसंत सावळाराम बाबाचे जीवनावर आधारीत 'श्रीसंत सावळाराम महाराज म्हात्रे' यांचे जीवन चरित्र या परिसवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमामध्ये सावळाराम बाबाचे नातू ह. भ.प.चेतन महाराज म्हात्रे, वसुधैव कुटुम्बकम अध्यात्म पिठाचे परमाध्यक्ष आचार्य ह.भ.प.प्रल्हाद शास्त्री महाराज, जेष्ठ वारकरी ह.भ.प.गोविंद तरणे महाराज, महंत ह.भ.प. बालकृष्ण महाराज यांचा सहभाग असून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आषापभू ह.भ.प. जगन्नाथ महाराज, तसेच या कार्यक्रमांमध्ये ह.भ.प. जनार्दन महाराज इलाहे, ह.भ.प गणेश महाराज ह.भ.प अनंत महाराज, ह.भ. प प्रकाश महाराज म्हात्रे, ह.भ.प हनुमान महाराज पाटील यांचाही सहभाग असणार आहे.

आगरी महोत्सव च्या माध्यमातून जमा झालेल्या निधी मधील काही भाग, सामाजिक बांधिलकीची पवणूक करण्याचा हेतूने आम्ही खर्च करत असतो. त्याअनुषंगाने स्वर्गीय नकुल पाटील साहित्य पुरस्कार, स्वर्गीय हरिचंद्र पाटील स्मृती शिक्षक पुरस्कार, स्वर्गीय गोविंद चौधरी स्मृती क्रीडा पुरस्कार, स्वर्गीय सुदाम भोईर स्मृती समाज गौरव पुरस्कार देऊन त्या त्या क्षेत्रातील गुणवंतांना सन्मानित करण्यात येत असतें. त्यासाठी प्रत्येक वर्षी एक लाखाहून अधिक निधी पुरस्कारासाठी खर्च केली जाते. त्याचबरोबर दरवर्षी दहावी उत्तीर्ण, पदवी, पदविका, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या वि‌द्यार्थ्यांना समाजाच्या व्यासपीठावर प्रमाणपत्र आणि भेटावस्तु देऊन सन्मानित करण्यात येते, ही गुणवंतांच्या सन्मानांची परंपरा आम्ही गेली ३५ वर्षे सतत्यपूर्ण कार्याने जपली आहे.. तसेच यावर्षी समाजातील होतकरू गरजू ५० वि‌द्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दहा हजार प्रमाणे रुपये पाच लाखाचा निधी खर्च करण्याचे उ‌द्दिष्ट आम्ही ठेवलेले आहे असे अध्यक्ष शरद पाटील यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande