बोईसरमध्ये गुटखा माफिया पुन्हा सक्रिय; अमनचा अवैध धंदा उघडपणे सुरू
पालघर, 6 डिसेंबर, (हिं.स.)। बोईसर परिसरातील कुख्यात गुटखा माफिया अमन पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून विविध भागांत गुटख्याची बेकायदेशीर विक्री堂 सुरू असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

गणेश नगर, काटकर पाडा, भीम नगर, दांडी पाडा, भैय्या पाडा आणि धोडीपूजा परिसरात अमनकडून पुरवठा होणारा गुटखा उघडपणे आणि बिनधास्तपणे विकला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एमआयडीसी परिसरातील टपऱ्या, झोपडपट्टी भागातील अनेक दुकानांवर हा गुटखा सहज उपलब्ध होत असून, पोलिस कारवाईचा कोणताही धाक दिसून येत नाही.

पालघर पोलीस अधीक्षकांच्या सक्रियतेमुळे काही महिन्यांपूर्वी गुटखा विक्रीवर आळा बसला होता. मात्र गेल्या काही दिवसांत बोईसर शहरात अमनकडून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा पुरवठा पुन्हा सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचे बोईसरमध्ये जाळ्यासारखे पसरलेले नेटवर्क असून त्याच मार्फत अवैध गुटखा विक्रीचा धंदा फोफावत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

बोईसर परिसरात पुन्हा वाढू लागलेली गुटखा विक्री रोखण्यासाठी तातडीने कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलीस दलाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL

 rajesh pande