
धुळे, 6 डिसेंबर (हिं.स.) घरगुती गॅस सिलेंडर मधुन वाहना मध्ये गॅस रिफीलींग करणारे धुळे शहरातील सहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज २५ हजार ४०० रुपये किंमतीचे एकुण सात गॅस सिलेंडर, व गॅस भरण्याचे साहित्य हस्तगत केले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना दिलेल्या आदेशानंतर धुळे शहरात विविध सहा ठिकाणी छापे घालण्यात आले.
या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर मधुन बेकायदेशिर रित्या वाहनात इंधन म्हणुन गॅस भरुन दिलाजात असल्याचे यावेळी उघड झाले. धुळे शहर, आझादनगर, देवपूर, चाळीसगावरोड व मोहाडीनगर पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी एकाच वेळी हे छापे टाकण्यात आले. देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील चंदन नगर, मोचीवाडा येथील सार्वजनिक शौचालय लगत प्रदिप रुपचंद सुर्यवंशी, (वय-४८) वर्ष, रा. विष्णुनगर, मोचीवाडा, देवपूर धुळे यास घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशिर साठा व गॅस रिफीलींगचे साहित्य कब्जात बाळगतांना मिळुन आल्यानेत्याचेविरुध्द देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर