
नवी दिल्ली, 6 डिसेंबर (हिं.स.) आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारतीय डिस्कस थ्रोअर सीमा पुनिया हिच्यावर डोपिंग उल्लंघनासाठी १६ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. ४२ वर्षीय या खेळाडूची बंदी १० नोव्हेंबरपासून लागू झाली आहे. राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सी (नाडा) ने जाहीर केलेल्या डोपिंग गुन्हेगारांच्या अद्ययावत यादीत ही माहिती उघड झाली. पण नाडाने सीमा पुनिया कोणत्या प्रतिबंधित पदार्थासाठी पॉझिटिव्ह आढळली हे स्पष्ट केलेले नाही.
सीमा पुनियाने यापूर्वी दोनदा डोपिंग नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यापैकी एक ज्युनियर स्तरावर घडला होता. ही घटना तिच्या कारकिर्दीवरील आणखी एक मोठा कलंक बनली आहे.
सीमा पुनियाने तिच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. तिची शेवटची मोठी स्पर्धा २०२३ हांगझोऊ आशियाई खेळ होतीय या स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले होते.
सीमा पुनियाची कारकीर्दी-
आशियाई खेळ: २०१४ मध्ये इंचॉनमध्ये सुवर्णपदक
राष्ट्रकुल खेळ: एकूण ४ पदके (तीन रौप्य पदके, एक पदक)
ज्युनियर पातळी: २००२ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक
सीमा पुनिया व्यतिरिक्त, इतर अनेक खेळाडूंवर देखील डोपिंगसाठी बंदी घालण्यात आली आहे.
खेळाडूंच्या खेळावरील बंदी आणि कालावधी
पूजा यादव (धावणे) - ४ वर्षे
मनजीत कुमार (शॉट पुट) - ६ वर्षे
निकेश धनराज राठोड (धावणे) - ४ वर्षे
कुलदीप सिंग (मॅरेथॉन) - ४ वर्षे
छवी यादव (स्टीपलचेस) - ४ वर्षे
सीमा पुनियासारख्या अनुभवी आणि पदक विजेत्या खेळाडूचे डोपिंग आढळणे हा भारतीय ऍथलेटिक्ससाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. या घटनेने क्रीडा जगतात डोपिंग नियंत्रण प्रणाली आणि खेळाडूंच्या जागरूकतेबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे