मेट्रो हडपसर ते लोणी काळभोर, सासवडपर्यंत धावणार
पुणे, 6 डिसेंबर (हिं.स.)। पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा-२ मधील महत्त्वाकांक्षी खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या मार्गाच्या दोन उपमार्गीकांना राज्य शासनाने प्रशासकीय आणि आर्थिक मान्यता दिली आहे. त्यामुळे हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस
Metro Train


पुणे, 6 डिसेंबर (हिं.स.)। पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा-२ मधील महत्त्वाकांक्षी खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या मार्गाच्या दोन उपमार्गीकांना राज्य शासनाने प्रशासकीय आणि आर्थिक मान्यता दिली आहे. त्यामुळे हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दरम्यान मेट्रो उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मेट्रोचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हडपसर, लोणी काळभोर, फुरसुंगी आणि सासवड सारख्या वेगाने विकसित होत असलेल्या भागांमध्ये नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. या दोन्ही मेट्रो मार्गावर तीन डब्याची मेट्रो रेल गाडी धावणार असून सुमारे 975 प्रवासी क्षमता असणार आहे. साधारणपणे प्रकल्पाचे काम चालू झाल्यापासून चार वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande