
कोल्हापूर, 6 डिसेंबर (हिं.स.)।
इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरातील एका कॅफेवर निर्भया पथकाने शुक्रवारी छापा टाकला.
अनैतिक संबधाची जोडपी, प्रेमी युगुले यांच्यासाठी, स्पेशल रूम करून दिल्याचे आणि त्या ठिकाणी काही जोडपी अश्लील चाळे करत असताना रंगेहाथ पकडली.
कॅफेअड्डा नावाच्या कॅफेवर . केलेल्या कारवाईत दोन प्रेमी युगुलांना ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी कॅफेअड्डाचा मालक संकेत शिवपुत्र हुबळे (वय २५, रा. कोरोची) आणि व्यवस्थापक शैलेश अनिल चंदुरे (३६, रा. शेळके मळा) या दोघांवर गावभाग पोलिसांनी गुन्हे दाखल केले. कॅफेमध्ये अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
या कॅफेत युवक, युवतींचा वावर असल्याची चर्चा सुरू होती. शहरात कॅफेच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्ये सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार निर्भया पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक संभाजी भोजकर, व त्यांच्या पथकाने झेंडा चौकातील कॅफे अड्डावर छापा टाकला. कारवाई होताच महाविद्यालयीन प्रेमी
युगुलांची तसेच कॅफेमधील जोडप्यांची धावपळ उडाली. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या पालकांना समज देण्यात आली.
कारवाईमध्ये कॅफेत सुरू असलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कॅफेमध्ये अश्लील चाळे करण्यासाठी दोन वेगळ्या स्पेशल रुम, वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळी सोय तसेच बाकडे यांचीही सोय करण्यात आल्याचे तसेच निरोधची पाकिटेही पोलिसांच्या निदर्शनास आले. कारवाईची माहिती समजताच शहरातील इतर ठिकाणी सुरु असलेल्या अनेक कॅफे चालकांनी व्यवसाय बंद ठेवले. तर पोलिस ठाण्यातच कॅफे चालक आणि त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. ही कारवाई उपनिरीक्षक संभाजी भोजकर, पो.कॉ. सिराजभाई, महादेवी पुजारी, प्रियंका चौगुले, सिध्दांत शेटे आदींच्या पथकाने केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar