सोलापूर जिल्ह्यातून राज्य परिवहन महामंडळाच्या हेल्पलाईनवर सर्वाधिक तक्रारी
सोलापूर, 6 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या साध्या, मध्यम व लांब पल्ल्याच्या बसमधून शालेय विद्यार्थी प्रवास करु शकणार आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता शाळा-क
st


सोलापूर, 6 डिसेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या साध्या, मध्यम व लांब पल्ल्याच्या बसमधून शालेय विद्यार्थी प्रवास करु शकणार आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हात करूनही गाडी न थांबल्यास विद्यार्थी १८००२२१२५१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतील. तक्रारीची खात्री करून संबंधित चालक, वाहक व आगारप्रमुखांवर कारवाई केली जाणार आहे.

परिवहन महामंडळाने १५ दिवसांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांसाठी खास हेल्पलाईन उपलब्ध करून दिली होती. त्यावर राज्यभरातून ३३४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक ५२ तक्रारी सोलापूर विभागातून प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये वेळेवर बस येत नाही, हात केला तर बस थांबत नाहीत, थांबा असूनही त्याठिकाणी बस थांबत नसल्याचे सांगितले जाते, अशा त्या तक्रारी आहेत. तसेच शालेय पास असूनही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जातो, अशाही तक्रारी आहेत. या तक्रारींची गंभीर दखल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. तक्रारींच्या अनुषंगाने लवकर कार्यवाही तथा सुधारणा करावी, अन्यथा शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षकांना निलंबित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande