सारंगखेडा घोडेबाजारात ‘रुद्राणी’ची किंमत तब्बल १ कोटी १७ लाख रुपये
नंदुरबार, 6 डिसेंबर (हिं.स.) आश्वांच्या पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील जागतिक घोडेबाजारात यंदा एक अद्वितीय आकर्षण ठरते आहे उत्तर प्रदेशातून आलेली ‘रुद्राणी’ ही देखणी व रुबाबदार घोडी. फक्त हजारो किंवा लाखात नव्हे, तर तब्बल कोटीच्या घ
सारंगखेडा घोडेबाजारात ‘रुद्राणी’ची किंमत तब्बल १ कोटी १७ लाख रुपये


नंदुरबार, 6 डिसेंबर (हिं.स.) आश्वांच्या पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील जागतिक घोडेबाजारात यंदा एक अद्वितीय आकर्षण ठरते आहे उत्तर प्रदेशातून आलेली ‘रुद्राणी’ ही देखणी व रुबाबदार घोडी. फक्त हजारो किंवा लाखात नव्हे, तर तब्बल कोटीच्या घरात किंमत असलेली ही घोडी अवघ्या बाजाराचे लक्ष वेधून घेत आहे. पंजाबातील पुष्कर येथे झालेल्या प्रतिष्ठित बाजारात एका अश्वप्रेमींनी रुद्राणीची किंमत तब्बल १ कोटी १७ लाख रुपये लावली होती. मात्र या घोडीचे मालक विजय यादव यांनी कोणताही मोह न बाळगता घोडी विकण्यास ठाम नकार दिला. त्यामुळे रुद्राणीबद्दल उत्सुकता आणखी वाढली आहे. सारंगखेडा यात्रेत रुबाबदार चाल आणि देखणे रूप घेऊन दाखल झालेली ही घोडी ‘रुद्राश चेमपूरवाले’ यांची मुलगी तर प्रसिद्ध ‘राज नगीनाची’ नात आहे. अवघ्या २२ महिन्यांची असूनही रुद्राणीची उंची ६५ इंचांपेक्षा जास्त असल्याने ती यंदाच्या बाजारातील सर्वात उंच आणि देखणी घोडी ठरली आहे. तिच्या आगमनानंतर बाजारात मोठी गर्दी होत असून, प्रत्येकजण ‘रुद्राणी’चा एक नजरभर दर्शन घेण्यासाठी आतुर दिसत आहे.

रुद्राणीची देखणी ठेवण्यामागे तिच्या विशेष खुराकाचा मोठा वाटा आहे. तिला दररोज– ८ लिटर गाईचे दूध, केवळ बिसलरी पाणी,गहू आणि हरभऱ्याची भुसा सकाळ-सायंकाळ तासभर मालिश , त्यानंतर खायला १०० ग्रॅम मोहरीचे तेल असा तगडा आणि पौष्टिक आहार दिला जातो. मालक विजय यादव रुद्राणीला अत्यंत प्रेमाने आणि काळजीपूर्वक वाढवत असल्याचे सांगतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande