
नाशिक, 6 डिसेंबर (हिं.स.) - श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आणि मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल आणि मेडिकल ट्रस्ट यांच्या माध्यमातून, “एक हात मदतीचा” ह्या उपक्रमा अंतर्गत आदिवासी बांधवांसाठी भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन समर्थ गुरुपीठ महाव्यस्थापक चंद्रकांतदादा मोरे यांचे प्रमुख उपस्थितीत हरसूल येथे करण्यात आले आणि पाच हजार महिला, पुरुष, विद्यार्थी यांना विविध स्वरूपात मदतीचा हात देण्यात आला.विशेष म्हणजे या मेळाव्यात नाशिक विभागाचे सहाय्यक धर्मदाय आयुक्त विवेक सोनुने,सौ विजया सोनुने,मराठवाडा विभाग अन्न औषधी प्रशासन आयुक्त दयानंद पाटील, धर्मदाय निरीक्षक रमेश सोनवणे, नंदकुमार राऊत हे सर्व अधिकारी गण उपस्थित होते.
दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने आदिवासी पाड्यावर गरजू आदिवासी बांधवांना, भगिनींना आणि विद्यार्थ्यांना साडी, ब्लँकेट, किराणा,भांडी, शालेय साहित्य व दप्तर वाटप करण्यात येते .आज साडेचार हजार आदिवासी बांधव आणि पाचशे विद्यार्थांनी ह्या अभियानाचा लाभ घेतला. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 450 रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषधी वाटप केले. या प्रसंगी चंद्रकांतदादा मोरे यांनी व्यसनमुक्त भारत अभियान अंतर्गत, उपस्थित आदिवासी बांधवाना व्यसन मुक्ती संदर्भात प्रबोधन करून बांधवाना विनामूल्य व्यसन मुक्त काढा उपलब्ध करून दिला.श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या माध्यमातून व गुरुपीठ महाव्यस्थापक चंद्रकांतदादा मोरे यांचे पुढाकाराने त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, हरसूल भागातील छोटया, मोठया खेड्या, पाड्यात, गावात गेली अनेक वर्षांपासून अखंडित पणे रुग्णसेवा व इतर उपयोगी उपक्रम सुरु असून गेल्या आठ, दहा वर्षात लाखो बांधवानी या सेवेचा लाभ घेतला आहे.या कार्याचा विवेक सोनुने आणि दयानंद पाटील यांनी गौरव केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV