
सोलापूर, 6 डिसेंबर (हिं.स.)।
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी ग्रुप) च्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला विविध संस्थांचे कुलगुरू विशेष अतिथी डॉ. सुधीर गव्हाणे माजी कुलगुरू यांचे हस्ते हजारो मेणबतींचे प्रज्वलन करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रथम सुरुवातीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय अध्यक्ष अनिल बनसोडे, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे, श्रीमंत जाधव, बापू जाधव, ॲड. विशाल मस्के, पी.बी. ग्रुपचे अध्यक्ष बाबा गायकवाड, उमेश रणदिवे, संतोष चंदनशिवे व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड