
बीड, 6 डिसेंबर (हिं.स.)। बीड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि 52 नगरसेवक पदासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणार आहे. एकूण अठरा टेबलवर मतमोजणी होईल. तेरा राउंड होतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव यांनी दिली.
बीड नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी माहिती दिली. बीड नगराध्यक्ष पदासाठी आणि 51 नगरसेवक पदासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले. प्रभाग क्र 3 ब चे मतदान 20 डिसेंबर रोजी होणार आहे.
त्यानंतर 21 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी सुरु होईल.
सुरुवातीला पोस्टल मतमोजणी केली जाईल, त्यानंतर 17 टेबलवर प्रत्येकी दोन प्रभागाची मतमोजणी होईल तर अठराव्या टेबलवर नगरध्यक्ष पदासाठी मोजणी होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis