शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा शासनाने विचार करावा - आ. संदीप क्षीरसागर
बीड, 6 डिसेंबर (हिं.स.) - महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक व शिक्षकेत्तर
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा शासनाने विचार करावा आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी


बीड, 6 डिसेंबर (हिं.स.) - महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झालेले आहेत. आ. संदिप क्षीरसागर यांनी सदरील आंदोलनाची दखल घेवून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या विषयक अनिवार्यतेच्या निर्णयास अनुसरून पुर्नविचार याचिका दाखल करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमीत वेतन श्रेणी लागू करावी, शिक्षकांनाही १०, २०, ३० वर्षांनंतरची सुधारीत तीन वेतन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू कराची, १५ मार्च २०२४ चा संचमान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा,

राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी यांची बंद असलेली पदभरती तात्काळ सुरू करावी, विषय पदविधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मध्ये भेदभाव न करता मंजुरी द्यावी इ. मागण्यांसाठी महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचायांनी आंदोलन केले आहे. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शनिवारी (दि.०५) रोजी शाळाही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हे गेल्या अनेक दिवसांपासुन विविध माध्यमातुन आंदोलन करत आहेत. शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक घटक आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्या मागण्यांचा संवेदनशीलपणे आणि सकारात्मकपणे विचार करावा असे आ. संदिप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. या संदर्भात आ. क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री तसेच शालेय शिक्षणमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande