संवेदनशील माणूस तयार करणे हेच साहित्याचे प्रयोजन : सदानंद पुंडपाळ
मुंबई, 6 डिसेंबर, (हिं. स.) : आज तंत्रज्ञानाने जग जवळ आणले, तरी माणूस माणसापासून दूर चाललाय. नाती महाग होऊ लागली आहेत. अशा वेळी संवेदनशीलता जागवून साने गुरुजींची खरा तो एकचि धर्म ही शिकवण अनुसरायला हवी, असे प्रतिपादन सदानंद पुंडपाळ यांनी केले. देव
बालकुमार साहित्य संमेलनापूर्वी निघालेली ग्रंथदिंडी


मुंबई, 6 डिसेंबर, (हिं. स.) : आज तंत्रज्ञानाने जग जवळ आणले, तरी माणूस माणसापासून दूर चाललाय. नाती महाग होऊ लागली आहेत. अशा वेळी संवेदनशीलता जागवून साने गुरुजींची खरा तो एकचि धर्म ही शिकवण अनुसरायला हवी, असे प्रतिपादन सदानंद पुंडपाळ यांनी केले.

देवनार (मुंबई) येथे आयोजित बालकुमार साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. मुंबई मराठी साहित्य संघ आणि देवनार येथील कुमुद विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री. पुंडपाळ म्हणाले, यावेळी जुन्या काळात साक्षरतेचे प्रमाण कमी होते, तरी माणसे संस्कारी होती, संवेदनशील होती. आज त्याचीच वानवा जाणवत असून एखाद्याला झालेला अपघात पाहूनही लोक त्याला मदत न करता मोबाइलवर फोटो काढून ते सोशल मीडियावर अपलोड करण्यात धन्यता मानत आहेत, हे त्यांचे वर्तन त्यांची संवेदनशीलता हरवल्याचे लक्षण आहे. यासाठी बालसाहित्याच्या माध्यमातून संवेदना जागवण्याचे काम करायला हवे.

यावेळी संघाच्या कार्याध्यक्ष डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी साहित्य आणि संमेलनाच्या प्रयोजनाबद्दल मौलिक विचार मांडले. कोषाध्यक्ष आनंद बिर्जे यांनी साहित्य मनोरंजनाबरोबर प्रबोधन करते असे सांगितले.

प्रा. प्रतिभा सराफ यांनी साहित्य संघाच्या कार्याचा आढावा घेतला. कुमुद मेमोरियल फंडच्या अध्यक्ष श्रीमती मीना पाटील यांनी स्वागत केले. नोकरीच्या मागे न लागता सुप्त गुणांना वाव देऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात उतरावे, असे संमेलनाच्या उद्घाटक अलबत्या गलबत्या फेम अभिनेत्री श्रद्धा हांडे यांनी सांगितले.

सकाळी नऊ वाजता श्री. पुंडपाळ, प्रा. प्रतिभा सराफ, समन्वयक बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड, श्रीमती प्रतिभा बिस्वास यांच्या हस्ते ग्रंथपूजनाने व ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरवात झाली. यावेळी लेझिम आणि ढोलताशाच्या गजरात ग्रंथदिडी काढण्यात आली.

त्यानंतरच्या उद्घाटनाच्या सत्रात ग्रंथभेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दुसऱ्या सत्रात 'श्यामशी आई' या चित्रपटात 'श्याम'ची बालकलाकाराची भूमिका साकारणारा अभिनेता शर्व गाडगीळ याची मुलाखत, ज्येष्ठ कथाकथनकार मेघना साने व ज्येष्ठ कवी प्रथमेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली आंतरशालेय कथाकथन व कविसंमेलन अशा भरगच्च कार्यक्रम होता.

मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रा. सुहासिनी कीर्तिकर, सावित्री हेगडे, मीनाक्षी जयकर, अरुण जोशी, प्रा. रजनी कुलकर्णी, शाळेचे विश्वस्त महादेव कोळी, विलास कांबळे, पर्यवेक्षिका मनीषा मोरे इ. मान्यवरांसहित विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande