
बीड, 6 डिसेंबर (हिं.स.)। बीड शहरातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहातूक कोंडी पहायला मिळत आहे. यामध्ये सर्वात जास्त वाहातूक कोंडी बार्शी रोड परिसरातील शिवराज पानसेंटर ते बार्शी नाका या परिसरात जास्त वाहतूक कोंडी होत असून याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. त्याचबरोबर नगरनाका, अण्णाभाऊ साठे चौक, अंबिका चौक, सुभाष रोड यासह इतर ठिकाणी वाहातूक कोंडी होत आहे. यातील काही ठिकाणी संबंधित मंगल कार्यालय नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे वाहातूक कोंडीत भर पडत आहे. अनेक वेळा या मंगल कार्यालय चालकांना संबंधित विभागाने नोटीस बजावूनही ही नोटीस पार्कंगची सोय करताना दिसत नाही. यामुळे दिवसेंदिवस वाहातूक कोंडीचा प्रश्न भेडसावत आहे. तरी हा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर पोलीस प्रशासन, नगरपालिका यांनी संयुक्त बैठक घेवून हा प्रश्न कसा मार्गी लागेल यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांना संपर्क साधला असता पोलीस अधीक्षक वाहातूक कोंडी सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून यासंदर्भात संबंधित ठाणेदाराला योग्य त्या सूचना केल्या आहेत. या रस्त्यावर जे काही मंगल कार्यालये आहेत त्यांनासुद्धा नोटीस काढून लवकरच संबंधित मंगल कार्यालय यांची बैठक बोलावून त्यांना योग्य त्या सूचना करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis