रत्नागिरी पालिकेच्या दोन जागांसाठी २० डिसेंबरला मतदान
रत्नागिरी, 6 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्र. १० मधील ''अ'' व ''ब'' या दोन जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी व निकाल जाहीर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २१ डिसेंबरला होईल, असे आदेश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांन
रत्नागिरी पालिकेच्या दोन जागांसाठी २० डिसेंबरला मतदान


रत्नागिरी, 6 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्र. १० मधील 'अ' व 'ब' या दोन जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी व निकाल जाहीर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २१ डिसेंबरला होईल, असे आदेश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी काढले आहेत.

रत्नागिरीतील प्रभाग क्र. १० मधील सदस्यपदांकरिता सार्वत्रिक निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, तर शेतजमीन व न्यायाधिकरण अप्पर तहसीलदार आणि रत्नागिरीतील निवासी नायब तहसीलदार हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्याची तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची ११ डिसेंबर ही मुदत आहे.

दरम्यान, २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याची तारीख २१ डिसेंबरला सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल. मतमोजणी रत्नागिरी नगरपालिकेतील ठिकाण संत गाडगेबाबा सभागृहात होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande