
बीड, 6 डिसेंबर, (हिं.स.)। बीड मतदारसंघातील महाडीबीटी अंतर्गत लॉटरी पद्धतीने पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांना अनुदान तात्काळ वितरीत करण्यात यावे, अशी ठोस मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. लॉटरी प्रक्रियेत निवड झाल्यानंतर अनेक लाभार्थी शेतक-यांनी आवश्यक ती खरेदी पूर्ण केली आहे. मात्र सहा-सहा महिने उलटूनही अनुदानाची रक्का खात्यात जमा होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत
महाडीबीटी अनुदान वितरणाला गती द्या; बीड जिल्हाधिकाऱ्यांना अनिल जगताप यांनी निवेदन दिले आहे
निधी न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून तात्काळ निर्णयाची अपेक्षा आहे. पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान तत्काळ मंजूर करून त्यांच्या खात्यात जमा करावे, जेणेकरून शेतकरी बांधवांवर अन्याय होणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis