
सोलापूर, 6 डिसेंबर (हिं.स.)।
सोलापुरात २४ तास हृदयरोग सेवा उपलब्ध असणाऱ्या एसीएस हॉस्पिटलमध्ये कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील अवघ्या ९ महिन्यांच्या बाळावर 'पीडिए डिव्हाईस क्लोजर' आणि लातूर येथील ९१ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकावर 'टॅव्ही' ही अतिजिटल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. याबाबत हृदयरोग तज्ञ डॉ. सिद्धांत गांधी आणि हृदयरोग तज्ञ डॉ. राहुल कारीमुंगी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.लातूर येथील तब्बल ९१ वर्षे वय असलेले जेष्ठ नागरिक हृदयासंबंधीत आजाराने त्रस्त होते. गेल्या वर्षीपासून त्यांना दम लागणे, छातीत दुखणे, भोवळ येणे असा असलेला त्रास मागील महिनाभरात वाढला होता. टू डी इको चाचणी केल्यानंतर हृदयातील झडप खराब असल्याचे निदान झाले होते. त्यांचे वय खूप असल्याने पायातील रक्तवाहिनीमार्गे झडप बदलावी लागणार होती. त्यावेळी डॉ. सिद्धांत गांधी यांनी रुग्णाला संभाव्य धोके, उपचारासाठीची कल्पना देऊन झडप बदलण्याचा सल्ला दिला. वयोवृद्ध रुग्णाला एसीएस हॉस्पिटलमध्ये दाखल करताना त्यांचा दम खूप वाढला होता. तसेच किडनीवर सूज होती. त्याचबरोबर हृदयाची रक्ताभिसरण प्रक्रिया ४०% च होत होती. डॉ. सिद्धांत गांधी यांनी अतिशय कौशल्याने ९१ वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या पायातून पायातील रक्तवाहिनीच्या माध्यमातून हृदयाची खराब झालेली झडप बदलली. रुग्णाची शारीरिक आणि मानसिकही स्थिती उत्तम असल्याचा परिणाम म्हणून रुग्णाने उपचारास अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला, असे हृदयरोग तज्ञ डॉ. सिद्धांत गांधी यांनी याप्रसंगी सांगितली. डॉ. सिद्धांत गांधी यांना या कामी डॉ. दीपक गायकवाड, डॉ. चिराग पारेख, डॉ. विजय अंधारे , भूलतज्ज्ञ डॉ. मंजूनाथ डफळे यांची मदत झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड