सोलापूर - कॉन्ट्रॅक्टर कडून धनदांडग्यांना सूट; सर्वसामान्यांना त्रास
सोलापूर, 6 डिसेंबर (हिं.स.)। शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे हे आपल्या विकास कामाबाबत फारच जागरूक असतात. विशेष करून रस्ते, ड्रेनेज याची कामे ते स्वतः तपासतात. त्यामुळे कंत्राटदार सुद्धा कामांमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीत. पण शहर मध्य मधील कुमठा नाका
सोलापूर - कॉन्ट्रॅक्टर कडून धनदांडग्यांना सूट; सर्वसामान्यांना त्रास


सोलापूर, 6 डिसेंबर (हिं.स.)। शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे हे आपल्या विकास कामाबाबत फारच जागरूक असतात. विशेष करून रस्ते, ड्रेनेज याची कामे ते स्वतः तपासतात. त्यामुळे कंत्राटदार सुद्धा कामांमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीत.

पण शहर मध्य मधील कुमठा नाका परिसरातील सम्राट अशोक हाउसिंग सोसायटी कडून दिवंगत तोराप्पा मसाजी क्षीरसागर ते आर्किटेक्चर कॉलेज पर्यंत असा जो मार्ग आहे त्या रस्त्याचे काम काही दिवसापासून सुरू आहे. एक तर बऱ्याच वर्षांनी काम सुरू झाले आहे. त्या रस्त्यावर गुमास्ता, डॉक्टर आंबेडकर, यशवंत, करुणा, जय भवानी या मोठ्या गृहनिर्माण सोसायेट्या आहेत. पण हा रस्ता करताना रस्त्याला लागून बांधण्यात आलेले कट्टे आणि पायऱ्या व काही अतिक्रमण आहेत. पण त्या कॉन्ट्रॅक्टरने काही मोठ्या धन दांडग्या लोकांचे जाणीवपूर्वक कट्टे आणि पायऱ्या याला हात न लावता काही सर्वसामान्य लोकांचे कट्टे आणि पायऱ्या तोडले असल्याचे समोर आले आहे. हा दुजाभाव कशासाठी? काढायचे तर सरसकट सर्वांचेचं काढायचे जाणीवपूर्वक काही मोठ्या लोकांना यामध्ये सूट कशाला असा प्रश्न सर्वसामान्य लोकांनी उपस्थित केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande