
नांदेड, 7 डिसेंबर (हिं.स.)।
अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन हायवा आणि एक टिप्पर अशा चार वाहनांना वाळूसह ताब्यात घेतले आहे. या घटनेत अंदाजे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे समजते.
अर्धापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे सहाय्यक पोलीस निरीक्षक चित्तरंजन ढेमकेवाड हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाल्यावरुन पिंपळगांव पाटी येथील विश्वप्रयाग हॉटेलचे पाठीमागे पथक गेले असता तेथे हायवा क्रमांक MH-26-CH-1629, हायवा क्रमांक MH-26-CH-2877, हायवा क्रमांक MH-21-BH-2635 व टीप्पर क्रमांक MH-48-J-0885 असे चार वाहनं अवैध रेतीने भरलेले थांबून होते. हायवा, टिप्पर व रेती असा एकूण १ कोटी १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
पो. नि. चंद्रशेखर कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पो. स्टे. अर्धापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. चित्तरंजन ढेमकेवाड हे करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis