
छत्रपती संभाजीनगर, 7 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम घडवणारी बैठक पार पडली. आगामी राजकीय समीकरणे आणि महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता ही बैठक धोरणात्मक दृष्टीने निर्णायक ठरली.
बैठकीत उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर निष्ठा व्यक्त करत सांगितले की, “छत्रपती संभाजीनगरला विकासाच्या नव्या पर्वाकडे नेण्यासाठी भाजपा पूर्ण क्षमतेने आणि पूर्ण संघटनशक्तीने सज्ज आहे!”
बैठकीत महानगरपालिका निवडणुकीतील विजयाचा रोडमॅप संघटनाचे सशक्तीकरण व बूथस्तरावरील मजबुतीकरण नवमतदारांशी थेट संवादाचा आराखडा; जनकल्याणकारी योजनांचे प्रभावी संप्रेषण; शहराच्या विकासासाठी सुसूत्र आणि वेळबद्ध कार्ययोजना या सर्व मुद्यांवर अत्यंत तपशीलवार आणि कार्यक्षम चर्चा झाली.
पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प पुनः अधोरेखित करत, प्रत्येक विभाग, प्रभाग आणि मोर्चा स्तरावर पक्षाची ताकद ठोसपणे उभी करण्याचा निर्धार व्यक्त केला. संघटन विस्तार, जबाबदाऱ्यांचे योजक वाटप, कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आणि निवडणूक व्यवस्थापनासाठी आवश्यक दिशा–निर्देश यावर विशेष भर देण्यात आला.
------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis