एसटी बस भाड्याने घेतल्यानंतरही मनस्ताप, ग्राहक पंचायतीचा महामंडळाला 50 हजार रुपयांचा दंड
नाशिक, 7 डिसेंबर (हिं.स.)। - लग्नासाठी एसटी महामंडळाचीे बस केली. मात्र ती चुकीच्या पत्यावर पोचली. त्यातच बस रस्त्यात बंद पडली. त्यामुळे लग्नाला उशीर झाला. वर व वधु पक्षाला मनस्ताप सहन करावा लागला. म्हणुन एसटी महामंडळाने वर पित्याला पन्नास हजार
एसटी बस भाड्याने घेतल्यानंतरही मनस्ताप, ग्राहक पंचायतीचा महामंडळाला 50 हजार रुपयांचा दंड


नाशिक, 7 डिसेंबर (हिं.स.)।

- लग्नासाठी एसटी महामंडळाचीे बस केली. मात्र ती चुकीच्या पत्यावर पोचली. त्यातच बस रस्त्यात बंद पडली. त्यामुळे लग्नाला उशीर झाला. वर व वधु पक्षाला मनस्ताप सहन करावा लागला. म्हणुन एसटी महामंडळाने वर पित्याला पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश नाशिकच्या ग्राहक न्याय मंचने दिले आहेत.या खटल्याची माहीती अशी,नांदगाव येथील सलुन व्यवसायिक सतीश बिडवे यांच्या मुलाचा विवाह 23 फेब्रुवारी 2023 ला रोजी दुपारी साडे बारा वाजता मुक्काम पोस्ट बाबरा, ता. फुलंंब्री जि. संभाजी नगर येथे होता. त्यांनी वर्‍हाडाला घेऊन जाण्याासाठी टू बाय टू ची एसटी बस ठरवली होती व या कऱीता 15/02/2023 रोजी 22000 रुपये जमा केले होते. परंतु 23/02/2023 रोजी आगार व्यवस्थापकाने बस चालकाला चकुीचा पत्ता व मार्ग दिला बस बिडवे यांनी दिलेल्या पत्यावर न येता नांदगाव येथन नस्तनपुर या ठिकाणी गेली व त्यानंतर बस उशिराने बिडवे यांच्या घऱजवळ पोहोचली. लांबच्या ठिकाणी जाताना नांदगाव पासून पन्नास किलोमीटर अंतरावर सदरची बस रस्त्यात अचानक बंद पडली. बिडवे यानी तक्रारा केल्यानंंतर अर्ध्या तासात दुसरी बस देतो सांगितले.मात्र बस तीन तासा नंतर उपलब्ध झाली. त्यामुळे लग्नालाही उशीर झाला. वर्‍हाडाची मोठी गैरसोय झाली होती. वधु पक्षाही नाराज झाला होता.त्यामुळे बिडवे यानी महामंडळाच्या आगार व्यवस्थापका विरुध्द न्याय मंचात दाद मागीतली होती.या दाव्याची सुनावणी न्याया मंचच्या अध्यक्ष मंदाकीनी भोसले यांच्यासमोर चालली. बिडवे यांनी पाच लाखाची भरपाई मागीतली होती. दोन्ही बाजुुचेे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर भोसले व सदस्या कविता चव्हाण यानीं बिडवे यांंना झालेल्या त्रासा पोटी 50 हजार रुपये व अर्जाच्या खर्चा पोटी पाच हजार असे एकुन 55 हजार रुपये बिडवे यांना महांमंडळाने भरुन द्यावेत असे आदेश दिले आहे.बिडवे यांच्या तर्फे गौरव पवार, तानाजी वाजे यानी काम पाहीले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande