दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉनमध्ये ५,१७३ धावपटूंचा उत्साह!
ठाणे, 7 डिसेंबर (हिं.स.) : ठाण्याची सकाळ एका अभूतपूर्व उत्साहाने आज भारलेली होती. ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ''प्लेफ्री स्पोर्ट्स इंडिया'' आयोजित आणि ''दोस्ती रियल्टी'' प्रायोजित ''दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन स
दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन


दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन


ठाणे, 7 डिसेंबर (हिं.स.) : ठाण्याची सकाळ एका अभूतपूर्व उत्साहाने आज भारलेली होती. ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'प्लेफ्री स्पोर्ट्स इंडिया' आयोजित आणि 'दोस्ती रियल्टी' प्रायोजित 'दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन सीझन ४' चा समारोप यशस्वीरित्या झाला. यावर्षी ५,१७३ धावपटूंनी सहभाग घेतला आणि 'ब्रेकिंग बॅरियर्स, बिल्डिंग चॅम्पियन्स' ही संकल्पना खऱ्या अर्थाने साकारली. विशेष म्हणजे प्रियांका मदाने यांनी 'हार्ले-डेव्हिडसन एक्स४४०' जिंकून कार्यक्रमात अधिक रंगत आणली.

यंदाच्या पर्वाला 'दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन' अशी नवी ओळख मिळाली. या नवीन नावासह, आरोग्य, तंदुरुस्ती आणि सामूहिक सहभागाला प्रोत्साहन देण्याचा 'दोस्ती रियल्टी'चा संकल्प दिसून आला. या मॅरेथॉनमध्ये तरुण- वृद्धांपासून, कॉर्पोरेट क्षेत्रातील धावपटू आणि महिला धावपटू अशा विविध गटातील स्पर्धकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते १० किमी शर्यतीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, या मॅरेथॉन मध्ये ठाणेकर धावपटूंचा उत्साह आणि सहभाग अवर्णनीय आहे. ठाण्यात लोक सहभागाचे अशा प्रकारचे उपक्रम हे शहराला नवीन ओळख निर्माण करून देते. असे सांगत त्यांनी धावपटूंना शुभेच्छा दिल्या.

सर्व धावपटूंना प्रीमियम टी-शर्ट, विशेष फिनिशर मेडल देण्यात आले. विजेत्यांना ट्रॉफी, भेटवस्तू आणि स्पेशल व्हाउचर देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक सहभागीला 'बजाज जनरल इन्शुरन्स'चे इव्हेंट-डे कव्हर मिळाले, ज्यामुळे आयोजनाची गुणवत्ता अधिक वाढली.

या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल बोलताना, प्लेफ्री स्पोर्ट्स इंडियाचे सीईओ, सितांशू झा म्हणाले की, “दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन सीझन ४ ला मिळालेला प्रतिसाद विलक्षण आहे. ५,१७३ सहभागी ही ठाण्याची वाढत असलेली तंदुरुस्ती संस्कृती दर्शवते. फिनिश लाईन पार करणारा प्रत्येक धावपटू स्वतःमध्ये एक चॅम्पियन आहे. आमच्या सर्व प्रायोजक, भागीदार आणि स्वयंसेवकांचे आम्ही आभारी आहोत, ज्यांनी या इव्हेंटला भव्य यश मिळवून दिले.

ठाणेकरांना एकत्र आणणारा आणि निरोगी भविष्याकडे घेऊन जाणारा हा कार्यक्रम आता शहराच्या प्रमुख फिटनेस कार्यक्रमापैकी एक बनला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande