बीड : जिरेवाडी सोमेश्वर मंदिरात चोरी करणाऱ्या पाच जणांना अटक
बीड, 7 डिसेंबर (हिं.स.)। ग्रामीण पोलिसांनी जिरेवाडी येथील सोमेश्वर संस्थानाच्या मंदिरात झालेल्या चोरीचा छडा लावत पाच आरोपींच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींकडून चोरीचा काही ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जम करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर २०
जिरेवाडी सोमेश्वर मंदिरात चोरी करणाऱ्या पाच जणांना अटक


बीड, 7 डिसेंबर (हिं.स.)।

ग्रामीण पोलिसांनी जिरेवाडी येथील सोमेश्वर संस्थानाच्या मंदिरात झालेल्या चोरीचा छडा लावत पाच आरोपींच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींकडून चोरीचा काही ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जम करण्यात आली आहे.

२५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजल्यापासून ते २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान जिरेवाडी (तालुका परळी वैजीनाथ, जिल्हा बीड) येथील सोनेश्वर संस्थानाच्या मंदिराच्या सभागृहाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील गाभान्यातील दानपेटीचे कुलूप तोडून अंदाजे तीस हजार रुपये रोख रक्कम, चांदीची चंद्रकोर आणि एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे टाक बोरून नेले होते. या धार्मिक स्थळातील चोरीमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.

या प्रकरणी सोमेश्वर संस्थान जिरेवाडी समितीचे उपाध्यक्ष पाटलोबा सिताराम मुंडे (वय ४५, रा. जिरेवाडी) यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं. ४९९/२०२५, कलम ३३१ (४), ३०५ (अ) बीएनएस प्रमाणे २६ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व चेतना तिडके तसेच उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली परळी ग्रामीण पोलिसांनी या गुन्हयाचा बारकाईने तपास सुरू केला. गोपनीय बातमीदार आणि तपासातून पोलिसांनी वैभव विष्णु कोकरे (वय १९, रा. दाऊनापूर), बालाजी बबन चाटकर (वय २८,

रा. समतानगर, अंबाजोगाई), महादेव बाबुराव माने (वय २२, रा. वानटाकळी), छगन नानाजी खैरमोडे (वय ३२, रा. रविवारपेठ, अंबाजोगाई) आणि ऋषीकेश दगडु माने (वय २२, रा. बानटाकळी) या पाच आरोपींना अटक केली.

पोलिसांनी ४ डिसेंबर २०२५ रोजी या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, चोरीस गेलेली चांदीची चंद्रकोर, सोन्याचे टाक आणि १७०० रुपये रोख रकम जप्त केली आहे. गुन्ह्यातील उर्वरित रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरलेली हत्यारे जप्त करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी आरोपींना परळी वैजीनाथ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींची ८ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निमोणे हे करत असून, पोलीस निरीक्षक एम. ए. सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक मेंडके आणि पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्यासह सफौ टोले, पोहवा हरगांवकर, परजने, पोअं घोडके, केदार, वाघमारे या पोलीस पथकाने गुन्हा उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande