अपघातग्रस्त शेतकरी वारसांना मुंडे योजनेत ऑनलाईन अर्जाची सवलत
पुणे, 7 डिसेंबर (हिं.स.)। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज स्वीकृतीनंतर आता हे अनुदानही ''महाडीबीटी'' पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याने मंजूर केलेल्या अर्जाच
अपघातग्रस्त शेतकरी वारसांना मुंडे योजनेत ऑनलाईन अर्जाची सवलत


पुणे, 7 डिसेंबर (हिं.स.)।

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज स्वीकृतीनंतर आता हे अनुदानही 'महाडीबीटी' पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याने मंजूर केलेल्या अर्जाचे अनुदान थेट खात्यात जमा केले जाईल. पूर्वी ऑफलाईन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्ज प्रक्रियेतील सर्व टप्पे काढून प्रक्रिया डिजिटल करण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.शेतीत काम करताना विविध कारणांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना राज्यात घडतात. अशा घटनांमध्ये शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्यात एप्रिल २०२३ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबविली जाते. या योजनेत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत दिली जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande