नाशिक जिमखान्याचे श्रेयस हेकरे, अक्षत भांडारकर यांची महाराष्ट्र संघात निवड
- तेलंगणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळणार नाशिक, 7 डिसेंबर (हिं.स.)। : १७ वर्षांच्या आतील मुलांच्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या नाशिक जिमखान्याचे खेळाडू आणि एसएसके पब्लिक स्कुलचे विद्यार्थी श्रेयस हे
जिमखान्याचे श्रेयस हेकरे, अक्षत भांडारकर यांची महाराष्ट्र संघात निवड, तेलंगणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळणार


- तेलंगणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळणार

नाशिक, 7 डिसेंबर (हिं.स.)।

: १७ वर्षांच्या आतील मुलांच्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या नाशिक जिमखान्याचे खेळाडू आणि एसएसके पब्लिक स्कुलचे विद्यार्थी श्रेयस हेकरे आणि अक्षत भांडारकर या दोघांची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड करण्यात आली आहे.

हे दोघेही खेळाडू तेलंगणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात महाराष्ट्राच्या संघाकडून खेळणार आहेत. शिर्डी येथे झालेल्या १७ वर्षांच्या आतील मुलांच्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत नाशिक विभाग विरुद्ध पुणे विभाग या दोघांमध्ये अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात एसएसके पब्लिक स्कुलकडून खेळताना नाशिक संघाला उपविजेते पद मिळाले. परंतु तालुकास्तरीय ते राज्यस्तरीय अशा सर्व सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपविजेत्या संघातून नाशिक जिमखान्याच्या अक्षत आणि श्रेयसची महाराष्ट्र संघासाठी निवड करण्यात आली. श्रेयस आणि अक्षत हे दोघे खेळाडू सलामीचे फलंदाज असून, श्रेयस हा उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणूनही ओळखला जातो. या खेळाडूंना नाशिक जिमखान्याचे प्रशिक्षक संजय मराठे, एसएसके पब्लिक स्कुलचे कुणाल कातकाडे, कपिल शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले. दोघांच्याही निवडीबद्दल नाशिक जिमखाना, एसएसके पब्लिक स्कुल, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनसह सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande