नांदेडला मृत सक्षम ताटेच्या कुटुंबीयांना पोलिसांचे संरक्षण
नांदेड, 7 डिसेंबर (हिं.स.)। नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमप्रकरणातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सक्षम ताटे याचे कुटुंबीय तसेच त्याची प्रेयसी आंचल मामीडवार हिच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता
नांदेडला मृत सक्षम ताटेच्या कुटुंबीयांना पोलिसांचे संरक्षण


नांदेड, 7 डिसेंबर (हिं.स.)।

नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमप्रकरणातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर सक्षम ताटे याचे कुटुंबीय तसेच त्याची प्रेयसी आंचल मामीडवार हिच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. सक्षमच्या कुटुंबीयांना आणि आंचलच्या जीविताला धोका असल्याची भीती कुटुंबीयांनी वर्तवली होती. त्यामुळे आंचल मामीडवारसह आणि सक्षमच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्याची मागणी संघटनांनी केली होती. त्यानुसार संघसेननगर भागातील सक्षमच्या घराला २४ तास २ सशस्र पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला आहे.

सक्षमची हत्या करण्यापूर्वी आंचलच्या एका भावाने मित्रांसह त्याच्या घराची रेकी केली होती. ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यापैकी काही जण अजूनही मोकाट असण्याची शक्यता आहे. त्यांच्यापासून धोका असल्याने पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

जातीय विद्वेशातून हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे, असा आरोप करत वंचित बहुजन आघाडी आणि युथ टास्क फोर्सच्या वतीने आयटीआय चौकातून जिल्हाधि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. बोंढार येथील अक्षय भालेराव खून, हदगावमधील दयानंद कदम तसेच सक्षम ताटे यांची हत्या याच कारणातून झाली. वंचितचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीअबिरे पालमकर, निखील हौसरे यांनी नेतृत्त्व केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande