
सोलापूर, 7 डिसेंबर (हिं.स.)।
येत्या १३ डिसेंबर रोजी राज्यभर आयोजित होणाऱ्या लोकअदालतीत ई-चलान प्रकरणांची तडजोड कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही, असे स्पष्टीकरण अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे.
सन २०२५ पासून प्रलंबित ई-चलान प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी वाहतूक विभागाने महाराष्ट्र राज्य विधी आणि सेवा प्राधिकरणाच्या मंजुरीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र आगामी लोकअदालतीत एकही ई-चलान प्रकरण तडजोडीसाठी ठेवले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, काही यूट्यूब, इंस्टाग्राम व अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकअदालतीत ई-चलान दंडात सवलत मिळणार असल्याचा खोटा प्रचार करण्यात येत असल्याचे आढळले आहे. अशा चुकीच्या माहितीमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सोलापूर पोलिस विभागाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड