रत्नागिरी : गणित समूहाच्या ‘गणिती कोडे’ उपक्रमाला सावर्डे विद्यालयात प्रतिसाद
रत्नागिरी, 7 डिसेंबर, (हिं. स.) : सावर्डे (ता. चिपळूण) येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गणित समूहाने आयोजित केलेला ‘गणिती कोडे’ उपक्रम उत्साहात पार पडला. शासनाच्या गणित समूह उपक्रमांतर्गत हा का
गणित समूहाचा उपक्रम


रत्नागिरी, 7 डिसेंबर, (हिं. स.) : सावर्डे (ता. चिपळूण) येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गणित समूहाने आयोजित केलेला ‘गणिती कोडे’ उपक्रम उत्साहात पार पडला. शासनाच्या गणित समूह उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील कोडी सोडवण्याची पद्धत समजून देणे, गणिताचा अभ्यास अधिक मनोरंजक करण्याची गोडी लावणे आणि विषयाविषयी उत्सुकता निर्माण करणे हा या उपक्रमामागचा प्रमुख हेतू होता.

गणित समूहातील विद्यार्थ्यांनीच संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. समूह प्रमुख सातवीतील रिया सुर्वे, यश कदम, गार्गी घडशी, अर्णवी ठमके, समर्थ सोनवणे व सारंगी पाटील यांनी विविध रोचक गणिती कोडी देऊन विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना दिली.

‘चार चौकार पंधरा’, ‘मेंदूचा ट्रिझर’, वर्गमूळ-घनमूळ अशा विषयांवरील कोडी सोडवण्यात विद्यार्थी तब्बल एक तास गुंगून गेले. कार्यक्रमाचे नियोजन गणित शिक्षक साजिद चिकटे, गणेश बागवे व प्रशांत सकपाळ यांनी केले.

मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण, तसेच ज्येष्ठ शिक्षक अशोक शितोळे, नारायण कालप आणि मनोज कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande