छ. संभाजीनगर मार्गे मुंबई, हडपसर, शिर्डीसाठी तीन रेल्वे
छत्रपती संभाजीनगर, 7 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, दक्षिण मध्य रेल्वेने तीन महत्त्वाच्या मार्गांवर विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. यामुळे प्रवाशांना पुणे (हडपसर), मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस
छ. संभाजीनगर मार्गे मुंबई, हडपसर, शिर्डीसाठी तीन रेल्वे


छत्रपती संभाजीनगर, 7 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, दक्षिण मध्य रेल्वेने तीन महत्त्वाच्या मार्गांवर विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. यामुळे प्रवाशांना पुणे (हडपसर), मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) आणि शिर्डी (तिस्पती) या प्रमुख शहरांसाठी नवा आणि थेट पर्याय उपलब्ध झाला आहे. या विशेष गाड्या नांदेड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणार असल्याने या भागातील लाखो नागरिकांची सोय होणार आहे.

हैदराबाद ते हडपसर दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी सुरू करण्यात आली आहे. गाडी क्र. ०७५६७: हैदराबादहून ७ डिसेंबर (रविवार) रोजी रात्री ८:२५ वाजता सुटेल आणि ८ डिसेंबर (सोमवार) रोजी हडपसर येथे सकाळी ५:०० वाजता पोहोचेल.हैदराबाद आणि लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान विशेष गाडी (क्र. ०७१५० आणि ०७१५१) ०६.१२.२०२५ (शनिवार) या दिनांकांना एक फेरी पूर्ण करेल, तर तिरुपती ते साईनगर शिर्डी दरम्यान नवीन साप्ताहिक रेल्वे (क्र. ०७४२५) ९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही गाडी मंगळवारी दुपारी १२:५५ वाजता सुटेल आणि परभणी मार्गे छत्रपती संभाजीनगर येथे थांबेल. या सर्व विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाचे पर्याय उपलब्ध झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे ही गाडी सोमवारी सकाळी ०६:१५ वाजता पोहोचणार आहे, तर गाडी क्र. ०७१६८: हडपसरहून ८ डिसेंबर (सोमवार) रोजी सायंकाळी ७:०० वाजता सुटेल. या विशेष गाडीत एकूण २३ डबे असणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande