
सोलापूर, 7 डिसेंबर (हिं.स.)।
जुन्या भाषेतील हस्तलिखितांवर संशोधन करून विद्यार्थी व अभ्यासकांनी पारंपारिक ज्ञान, साहित्य समोर आणावे. त्यामध्ये मोठी ज्ञानसंपदा असून त्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहन आयआयटी, मुंबई येथील वरिष्ठ भाषाशास्त्रज्ञ डॉ. निलेश जोशी यांनी केले.पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा व वांग्मय संगोलातील संस्कृत विभाग आणि श्री समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे यांच्यावतीने आयोजित 'श्री समर्थ डॉ. निलेश जोशी, स्वामी लिखित वाल्मकीय रामायणाचे समीक्षात्मक अध्ययन' कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. जोशी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, भाषा संकुलाच्या संचालिका डॉ. अंजना लावंड, अधिसभा सदस्य चन्नवीर बंकुर, प्रसाद भंडारी आदींची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. निलेश जोशी सांगितले की, समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतः वाल्मिकी रामायणाचे बालखंडापासून ते युद्धखंडापर्यंत लिहिलेले लेखन ग्रंथ श्री समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे येथे उपलब्ध आहे. हस्तलिखित या ग्रंथाचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. यामध्ये मोठी ज्ञानसंपदा उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सगितले.
कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर म्हणाले की, संस्कृत, प्राकृत, मोडी लिपी या भाषांमध्ये भरपूर साहित्य व ज्ञान लपले आहे. त्यामुळे त्याचा संशोधन व अभ्यास करून जुने ज्ञान व साहित्य समोर आणण्यासाठी संशोधकांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड