
बीड, 7 डिसेंबर (हिं.स.)।
केकानवाडी शिवारात विनापरवाना दारू विक्री करताना दोघांना पोलिसांनी पकडले.
स्टेशन हद्दीमध्ये आसरडोह आडस रस्त्यावर केकानवाडी शिवारामध्ये दिव्या गार्डन समोर विनापरवाना देशी विदेशी दारूची विक्री करताना धारूर पोलिसांनी दोन जणांना पकडून मुद्देमाल व एक दुचाकी गाडी ताब्यात घेतली व दोन आरोपींना ताब्यात घेऊन बिना परवाना देशी विदेशी दारू विक्री चा गुन्हा दाखल करून पुढील तपास धारूर पोलीस करत आहे.
धारूर पोलिसांनी आसरडोह ते आडस रोडवर केकानवाडी शिवारात दिव्या गार्डन अँड रेस्टॉरंट समोर देशी व विदेशी दारू व बियर बार च्या बाटल्या विनापरवाना आर्थिक लाभाच्या दृष्टीने विकणाऱ्या दोन जणांना २२ हजार ५० रुपयाच्या
दारूच्या मुद्देमालासह व ११०००० रुपये किंमतीच्या काळ्या रंगाच्या होंडा कंपनीची युनिकॉर्न गाडी गाडी क्रमांक ४४ ए डी ००३३ सह एकूण १३२०५० रुपयाचा मुद्देमाला सह आरोपी संजयकुमार आप्पाराव दराडे व बप्पासाहेब शेषराव भांगे राहणार वडवणी जी. बीड या दोघांना मुद्देमाला सह ताब्यात घेतले असून यांच्याविरुद्ध पो. हे. काँ जमीर
अलाउद्दीन शेख यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरा न न ४४७/ २०२५ कलम ६५ (ई), ८३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अनन्बे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांचे मार्गदर्शना खाली पो. हे. काँ. पवार हे करत आहेत
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis