जळगाव : पोलिस भरतीसाठी उमेदवारांकडून मोठ्या जोमात सराव
जळगाव , 7 डिसेंबर (हिं.स.) पोलिस भरतीसाठी उमेदवारांकडून मोठ्या जोमात सराव सुरू असून, उमेदवार भल्या पहाटे धावणे, कसरती करत आहेत. पहाटे धुके, अपुऱ्या प्रकाशात सराव करताना काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. पोलिस मुख्यालय परिसरातील मैदान, शिवतीर्थ मैदानासह
जळगाव : पोलिस भरतीसाठी उमेदवारांकडून मोठ्या जोमात सराव


जळगाव , 7 डिसेंबर (हिं.स.) पोलिस भरतीसाठी उमेदवारांकडून मोठ्या जोमात सराव सुरू असून, उमेदवार भल्या पहाटे धावणे, कसरती करत आहेत. पहाटे धुके, अपुऱ्या प्रकाशात सराव करताना काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. पोलिस मुख्यालय परिसरातील मैदान, शिवतीर्थ मैदानासह मेहरुण तलाव परिसरात दररोज उमेदवार कसरत करीत आहेत.

जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर सन २०२४-२०२५ या कालावधीतील पोलिस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यभरात पोलिस दलामध्ये विविध पदे भरली जात आहेत. यात जळगाव जिल्ह्यात पोलिस शिपाई पदासाठी १७१ जागांवर भरती होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande