सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या श्वानमालकांना पुणे महापालिकेचा दणका
पुणे, 7 डिसेंबर (हिं.स.)। स्वच्छ भारत अभियान’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ अंतर्गत कोथरूड–बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत प्रभाग १२ मध्ये श्‍वानमालकांसाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. सकाळच्या वेळी श्‍वानांना फ
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या श्वानमालकांना पुणे महापालिकेचा दणका


पुणे, 7 डिसेंबर (हिं.स.)।

स्वच्छ भारत अभियान’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ अंतर्गत कोथरूड–बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत प्रभाग १२ मध्ये श्‍वानमालकांसाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. सकाळच्या वेळी श्‍वानांना फिरवताना सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या श्‍वानमालकांना सूचना देत, गांधीगिरीच्या माध्यमातून गुलाबपुष्प देऊन स्वच्छतेचे महत्त्व समजावण्यात आले, तसेच नियम न पाळणाऱ्या १० श्‍वानमालकांवर प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.ही मोहीम डहाणूकर कॉलनी, कमिन्स रस्ता, गोपीनाथनगर, कुमार परिसर, गांधी भवन, आशिष गार्डन डीपी रस्ता, परमहंसनगर, म्हातोबानगर, शिवतीर्थनगर आदी भागांत राबविण्यात आली. कोथरूड परिसरात सुरू असलेली ही जनजागृती व दंडात्मक मोहीम घनकचरा व्यवस्थापन आणि परिमंडळ कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील निरीक्षक आणि मुकादमांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात आली. या वेळी महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव, वरिष्ठ आरोग्य विभागाचे गणेश खिरीड, आरोग्य निरीक्षक करण कुंभार, किरण जाधव, दत्तात्रेय दळवी, राजेश आहेर, प्रमोद चव्हाण, लक्ष्मीकांत कुलकर्णी, गणेश साठे, गणेश चोंधे, जया सांगडे, मुकादम वैजीनाथ गायकवाड, अण्णा ढावरे, अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande