
पुणे, 7 डिसेंबर, (हिं.स.)।सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिक्त १११ पदांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यात ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत रविवारपर्यंत होती. याला मुदतवाढ दिली असून, आता दि. २१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. प्रभारी कुलसचिव प्रा. ज्योती भाकरे यांनी ही माहिती दिली.
विद्यापीठ कॅम्पसमधील विविध शैक्षणिक विभागांमधील शासनमान्य सहायक प्राध्यापक ४७, सहयोगी प्राध्यापक ३२ आणि प्राध्यापक ३२ अशा एकूण १११ रिक्त शिक्षकी पदांच्या भरतीची ही प्रक्रिया सुरू आहे. पूर्व नियाेजनानुसार ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया दि. ८ नोव्हेंबर ते दि. ७ डिसेंबर दरम्यान राबविली जाणार हाेती. त्यानंतर अर्जाची प्रत व संबंधित कागदपत्रे प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करण्यासाठी दि. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ पर्यंत मुदत दिलेली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु