परभणी - जय महाराष्ट्र निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन भुरेवार
परभणी, 7 डिसेंबर (हिं.स.)। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर येथील रामदास पवार यांच्या कार्यालयात जय महाराष्ट्र निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक संघटनेचे राज्याध्यक्ष माननीय अशोक डहाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या
जय महाराष्ट्र निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन भुरेवार


परभणी, 7 डिसेंबर (हिं.स.)।

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर येथील रामदास पवार यांच्या कार्यालयात जय महाराष्ट्र निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक संघटनेचे राज्याध्यक्ष माननीय अशोक डहाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत परभणी जिल्हा कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या निवडीत जय महाराष्ट्र निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना (खाजगी शाळा व महाविद्यालय) परभणी जिल्हाध्यक्षपदी सचिन भुरेवार यांची तर जिल्हा सचिवपदी शिवम दरबेशवार यांची निवड करण्यात आली. याबरोबरच नव्याने गठित जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष : रामदास पवार, जिल्हा कार्याध्यक्ष : सचिन लाड, कोषाध्यक्ष : नितीन तिखे, सहसचिव : रवींद्र सानप, सदस्य : संतोष नावाडे, प्रसाद मुंबईकर यांची तर संघटनेच्या मार्गदर्शक पथकात मुख्य सल्लागार : व्यंकटेश तोरंबेकर, सल्लागार सदस्य : प्रफुल्ल पोळ, बाबुशा जोगदंड, अर्जुन वैरागड यांची निवड करण्यात आली.

बैठकीत सर्व नव्या पदाधिकाऱ्यांना संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक डहाळे यांनी नियुक्तीपत्र प्रदान करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande