छ. संभाजीनगर : शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
छत्रपती संभाजीनगर, 7 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर, बजाजनगर येथे भाजपा प्रदेश महामंत्री आमदार संजय केणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेब घुगे आणि रमेश बागुल यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार
शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश


छत्रपती संभाजीनगर, 7 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर, बजाजनगर येथे भाजपा प्रदेश महामंत्री आमदार संजय केणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेब घुगे आणि रमेश बागुल यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

पारदर्शक आणि विकासाभिमुख नेतृत्वावरील दृढ विश्वासातून हा प्रवेश संपन्न झाला. प्रवेशकर्त्यांनी विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णायक, निर्भय आणि विकासाभिमुख नेतृत्वाचे मनापासून कौतुक करत राज्यात त्यांनी घडवलेल्या सर्वांगीण विकासगतीचा उल्लेख केला. महाजनादेश यात्रेपासून राज्यातील प्रत्येक महत्त्वपूर्ण प्रकल्पापर्यंत महाराष्ट्राने विकासाची नवी उंची गाठल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले. राष्ट्रहित, सांस्कृतिक अभिमान आणि हिंदू धर्मसंवर्धन यांवर आधारित भाजपच्या राष्ट्रवादी विचारसरणीशी एकरूप होत कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विजय संकल्पात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

-----------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande