समृद्धी महामार्गावर बंदुकीच्या गोळ्यांसाठीच्या ‘ब्रास कप’चे 42 नग चोरी
छत्रपती संभाजीनगर, 7 डिसेंबर (हिं.स.)। संरक्षण मंत्रालयाच्या अंबरनाथ येथील आयुध निर्माणीमधून जबलपूरकडे आयशर ट्रकमधून 280 गोण्यातून ब्रास कप घेऊन निघाले असताना ब्रास कप’चे 42 नग चोरट्यांनी पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.समृद्धी महामार्गावर
ब्रास कप


छत्रपती संभाजीनगर, 7 डिसेंबर (हिं.स.)।

संरक्षण मंत्रालयाच्या अंबरनाथ येथील आयुध निर्माणीमधून जबलपूरकडे आयशर ट्रकमधून 280 गोण्यातून ब्रास कप घेऊन निघाले असताना ब्रास कप’चे 42 नग चोरट्यांनी पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.समृद्धी महामार्गावर दौलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत संरक्षण मंत्रालयाच्या आयशर ट्रकमधून बंदुकीच्या गोळ्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ब्रास कप’चे 42 नग चोरट्यांनी पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकारा नंतर चालक व त्याच्या सहकाऱ्याने बुलढाणा जिल्ह्यातील बिबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्यावर ‘डायल 112’वर संपर्क साधून चोरीची माहिती दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या अंबरनाथ येथील आयुध निर्माणीमधून जबलपूरकडे मनीष नेवंदराम लोहानी (38, रा. अंबरनाथ वेस्ट, जि. ठाणे) हे आयशर ट्रकमधून (एमपी 04 जीबी 4464) 280 गोण्यातून ब्रास कप घेऊन निघाले होते. समृद्धीवरील चॅनल क्रमांक 451 जवळ चालकाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ट्रक थांबवला होता. दरम्यान, ट्रकच्या मागून आवाज आला. त्या वेळी चालकासह मागे जाऊन पाहिले असता एक व्यक्ती ताडपत्रीची दोरी कापून वर चढत होता. त्याच्यासोबतची दुसरी व्यक्ती दुचाकीवर होती.

या प्रकाराने गोंधळून गेल्याने बुलढाणा जिल्ह्यात गेल्यावर त्यांनी डायल 112 वर संपर्क साधला. त्यानंतर पोलिस स्टेशनचे हवालदार राजेश सरदार यांच्यासह चालकाने ट्रक दौलताबाद येथे आणला. पोलिसांच्या सूचनेवरून ट्रकमधील मालाची मोजणी केली असता 71 हजार 568 रुपयांचे ब्रास कपचे 42 नग गायब असल्याचे दिसले. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande