मोबाईल वापरावरून वडील रागविल्याने शाळकरी मुलीची आत्महत्या
नाशिक, 7 डिसेंबर (हिं.स.)। - मोबाईलच्या सतत होणाऱ्या वापरामुळे वडील रागवल्याने शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड परिसरामध्ये घडली आहे रुक्ख्मिनी संपत काळे असे मृत बालिकेचे नाव असून नाशिकराेड पाेलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यु
मोबाईल वापरावरून वडील रागविल्याने शाळकरी मुलीची आत्महत्या


नाशिक, 7 डिसेंबर (हिं.स.)।

- मोबाईलच्या सतत होणाऱ्या वापरामुळे वडील रागवल्याने शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड परिसरामध्ये घडली आहे

रुक्ख्मिनी संपत काळे असे मृत बालिकेचे नाव असून नाशिकराेड पाेलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नाेंद करण्यात आली आहे. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समाेर आले नसले तरी ती सतत माेबाईल पाहत हाेती. त्यातून कुटुंब रागावल्याने तिने हे पाऊल उचचले असावे, असा संशय पाेलिसांनी व्यक्त केला आहे. रुक्ख्मिनी (रा. जुन्या मारुती मंदिराजवळ, सामनगाव, नाशिकराेड) ही पाचवी इयत्तेत शिक्षण घेत हाेती. शुक्रवारी दुपारी आई वडील माेलमजुरीसाठी गेले असतानाच, तिने घरात असताना दुपारी दाेरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. घटना घडल्यानंतर ज्यावेळी लक्षात आले तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती बिटको रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले दरम्यान मोबाईल हा चिंतेचा विषय बनत चालला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande