
जळगाव, 7 डिसेंबर (हिं.स.) | स्थानिक बुलियन मार्केटमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या चढ-उतारांच्या मालिकेला आणखी रंग चढला. चांदीच्या भावात तब्बल २,२०० रुपयांची उसळी नोंदवली गेली असून दर १,८२,००० रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे सोन्याने मात्र घसरणीचा कल कायम ठेवत ६०० रुपयांनी खाली येत १,२८,२०० रुपये प्रति तोळा असा नीचांक गाठला.
१ डिसेंबर रोजी सोने १,२९,२०० रुपये या दराने व्यवहारात होते. त्यानंतर दररोज होत असलेल्या किरकोळ चढ-उतारांमुळे ५ डिसेंबरपर्यंत ते १,२८,८०० रुपये प्रति तोळा इतके खाली आले. अखेर ६ डिसेंबरला आणखी ६०० रुपयांची घसरण नोंदवत सोने १,२८,२०० रुपयांवर बंद झाले.दरम्यान, चांदीच्या भावातील अचानक झालेली वाढ व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा चर्चेला ऊत देत असून पुढील काही दिवसांतील बाजारस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर