
सोलापूर, 7 डिसेंबर (हिं.स.)।
उद्योजकांची सर्वाधिक मागणी चिंचोली (ता. मोहोळ) एमआयडीसीतील जागेसाठी आहे. पण तेथे सध्या एक-दोन एकराचेच प्लॉट शिल्लक आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ‘अतिरिक्त चिंचोली’अंतर्गत १५१ हेक्टरच्या भूसंपादनाचा प्रस्ताव दुरुस्तीसह राज्याच्या उद्योग विभागाकडे पाठविला. आता एक वर्ष होऊनही त्यावर अजूनपर्यंत भूसंपादनाचा निर्णय झालेला नाही,महामार्गांची कनेक्टिव्हीटी, गोवा, मुंबईची विमानसेवा, वंदे भारतसह अन्य रेल्वे अशी वाहतुकीची साधने, राहायला पंचतारांकित हॉटेल्स, उद्योगासाठी जागांचे दर अत्यल्प, वीज, पाण्याची मुबलक उपलब्धता आणि स्वस्तात मजूर, या बाबींमुळे मोठे उद्योजक सोलापूरमध्ये यायला इच्छुक आहेत. त्यामुळे सध्या चिंचोली एमआयडीसीत शिल्लक असलेल्या १२५ प्लॉटची मागणी उद्योजकांनी केली आहे. ७१ प्लॉटसाठी मोठी स्पर्धा असून त्याठिकाणी अंदाजे ३०० उद्योजकांचे अर्ज आहेत.काही महिन्यांपूर्वी त्या उद्योजकांना जागा द्यावी, यासाठी त्यांचे अर्ज तथा प्रस्ताव उद्योग विभागाच्या जागा वाटप समितीकडे (लॅण्ड अलॉटमेंट कमिटी) पाठविले. मात्र, त्याठिकाणी देखील निर्णयास विलंब होत आहे. दरम्यान, चिंचोली एमआयडीसीतील एकमेव शिल्लक असलेला १३ एकराचा मोठा प्लॉट प्राची फार्मासिटीकल कंपनीने मागितला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड