

टीव्हीएस अपाचे आरटीएक्स300 चे स्पेशल एडिशन प्रदर्शित
मुंबई, 7 डिसेंबर (हिं.स.)। सध्या सुरू असलेल्या टीव्हीएस मोटोसोलच्या पाचव्या आवृत्तीत पहिल्याच दिवशी टीव्हीएस मोटरने आपली नवी टीव्हीएस रोनिन अगोंडा लिमिटेड एडिशन बाइक लॉन्च केली आहे. यासोबतच कंपनीने नुकतीच सादर झालेली टीव्हीएस अपाचे आरटीएक्स ३०० ची 20व्या वर्षानिमित्त खास एनिव्हर्सरी एडिशन आवृत्तीही लोकांसमोर प्रदर्शित केले आहे.
कंपनीकडून सध्या केवळ रोनिन अगोंडाची किंमत जाहीर करण्यात आली असून ती एक्स-शोरूम 1.31 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ही किंमत बेस व्हेरिएंटपेक्षा सुमारे 5,300 रुपयांनी अधिक आहे, तर रोनिनचा बेस व्हेरिएंट सध्या 1.26 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. अपाचे आरटीएक्स 300 च्या 20th वर्धापनदिन एडिशनची किंमत येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
टीव्हीएस रोनिन अगोंडा ही साउथ गोव्यातील प्रसिद्ध अगोंडा बीचपासून प्रेरित लिमिटेड एडिशन बाइक आहे. या बाइकला आकर्षक व्हाइट पेंट स्कीम देण्यात आली असून फ्युएल टँकवर पाच स्ट्राइप्स असलेले खास ग्राफिक्स देण्यात आले आहेत. टँकवर “अगोंडा” असे डिझाइन स्टायलिश पद्धतीने लिहिले आहे. याशिवाय हेडलाईट काऊल देखील टँकच्या शेडशी मॅच करणाऱ्या फिनिशमध्ये देण्यात आले आहे, ज्यामुळे बाइकचा लूक अधिक प्रीमियम वाटतो. डिझाइन वगळता या बाइकच्या मेकॅनिकल घटकांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
इंजिनबाबत बोलायचे झाल्यास, रोनिन अगोंडामध्ये आधीप्रमाणेच 225.9cc चे सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7,750 rpm वर 20.12 bhp इतकी पॉवर आणि 3,750 rpm वर 19.93 Nm टॉर्क जनरेट करते. याला स्लिप-अँड-असिस्ट क्लचसह पाच-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे, ज्यामुळे रायडिंग अधिक स्मूथ आणि आरामदायक होते.
याच कार्यक्रमात कंपनीने टीव्हीएस अपाचे आरटीएक्स 300 चे 20th वर्धापन दिन आवृत्ती सुद्धा सादर केले आहे. अपाचे ब्रँडचे दोन दशक पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे खास एडिशन बाजारात आणण्यात आले आहे. या बाइकला शँपेन गोल्ड आणि ब्लॅक अशी आकर्षक ड्युअल-टोन कलर थीम देण्यात आली असून लिमिटेड एडिशन बॅजिंगमुळे तिचा लूक अधिक स्पेशल झाला आहे. फ्युएल टँकवर 20 वर्षांच्या प्रवासाची आठवण दर्शविणारा खास लोगो देण्यात आला आहे. तसेच गोल्ड आणि ब्लॅक रंगाच्या व्हील्समुळे ही बाइक स्टँडर्ड मॉडेलपेक्षा स्पष्टपणे वेगळी भासते. या कॉस्मेटिक बदलांव्यतिरिक्त बाइकच्या इतर तांत्रिक बाबींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
टीव्हीएस अपाचे आरटीएक्स 300 मध्ये कंपनीने नवीन 299.1cc RT-XD4 इंजिन दिले आहे. हे इंजिन 9,000 rpm वर 35.5 bhp इतकी पॉवर आणि 7,000 rpm वर 28.5 Nm टॉर्क निर्माण करते. या बाइकला सहा-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला असून त्यात बाय-डायरेक्शनल क्विक शिफ्टर, स्लिप-अँड-असिस्ट क्लच आणि राईड-बाय-वायर सिस्टिमसारखी आधुनिक फीचर्सही देण्यात आली आहेत. त्यामुळे ही बाइक परफॉर्मन्स आणि टेक्नॉलॉजी या दोन्ही बाबतीत अधिक प्रगत ठरते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule