सोलापूर - सीडीआर, मोबाईलबाबत 9 डिसेंबरला सुनावणी
सोलापूर, 7 डिसेंबर (हिं.स.) वळसंगकर कुटुंबिय आणि राऊत भगिनींच्या मोबाईल सीडीआर आणि टॉवर लोकेशन द्यावेत, मनीषा मुसळे-मानेचा मोबाईल मिळावा, या दोन अर्जावर मंगळवार, 9 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सोलापुरातील प्रसिध्द न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसं
सोलापूर - सीडीआर, मोबाईलबाबत 9 डिसेंबरला सुनावणी


सोलापूर, 7 डिसेंबर (हिं.स.) वळसंगकर कुटुंबिय आणि राऊत भगिनींच्या मोबाईल सीडीआर आणि टॉवर लोकेशन द्यावेत, मनीषा मुसळे-मानेचा मोबाईल मिळावा, या दोन अर्जावर मंगळवार, 9 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

सोलापुरातील प्रसिध्द न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या मनीषा मुसळे-माने हिने या गुन्ह्यात दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात सादर केला आहे. त्याचबरोबर वळसंगकर कुटुंबियांसोबतच इतर काही लोकांचे मोबाईल सीडीआर जतन करण्याची तसेच तिचा मोबाईल मिळण्याची मागणी केली होती. या अर्जांपैकी दोषमुक्तीचा अर्ज वगळता इतर दोन अर्जावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंनी याबाबत युक्तिवाद करण्यात आला. याबाबत आदेशासाठी सुनावणी ठेवली होती.न्यायालयाने ती सुनावणी पुढे ढकलली असून आता 9 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या खटल्यात मनीषा मुसळे- माने हिच्यातर्फे ॲड. प्रशांत नवगिरे तर सरकारतर्फे ॲड. प्रदीपसिंह रजपूत हे काम पाहत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande