
बीड, 7 डिसेंबर (हिं.स.)।
केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक; रुग्णांचा संताप
उपजिल्हा रुग्णालयाची प्रशस्त मोठी इमारत बांधण्यात आली. बांधकाम पूर्ण झाल्यापासून काही कालावधीतच शौचालयांचे आउटलेट अर्धवट ब्लॉक -झाल्याने रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना प्रचंड गैरसोय होत आहे. रुग्णालयातील मुख्य इमारतीतील पुरुष आणि महिला शौचालयांमधून सांडपाणी परत येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुर्गंधीमुळे
- परिसरात अस्वच्छता पसरली
शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी आहे. रुग्णालयात ऍडमिट होऊन औषध उपचार घेणान्या रुग्णांना शौचालये वापरण्यास अयोग्य झाल्याने रुग्णांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे. दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, रुग्णालयात रोज शेकडो रुग्णांची वर्दळ असताना अशा प्रकारची स्वच्छता समस्या गंभीर ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. अनेक नातेवाईकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी उपजिल्हा रुग्णालय, केज
दुरुस्तीचे काम झालेले नाही. एकीकडे रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना उपचार घेतल्याशिवाय पर्याय नाही. लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रुग्णांची गैरसोय थांबवावी अशी मागणी केली जात आहे
सार्वजनिक बांधकाम विभागाची टोलवाटोलवी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने आउटलेट ब्लॉक झाल्याच्या संदर्भान सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन कित्येक वेळा मागणी केली मात्र दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis