छ. संभाजीनगर - ट्रॅक्टर खड्ड्यात कोसळल्याने एकाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर, 7 डिसेंबर (हिं.स.)। पैठण तालुक्यातील गेवराई खुर्द शिवारात ट्रॅक्टर खड्यात कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पंढरीनाथ ज्ञानदेव चव्हाण (५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गेवराई खुर्द येथील अल्पभूधारक शेतकरी होते. गावालगत गट क
छ. संभाजीनगर - ट्रॅक्टर खड्ड्यात कोसळल्याने एकाचा मृत्यू


छत्रपती संभाजीनगर, 7 डिसेंबर (हिं.स.)। पैठण तालुक्यातील गेवराई खुर्द शिवारात ट्रॅक्टर खड्यात कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पंढरीनाथ ज्ञानदेव चव्हाण (५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

ते गेवराई खुर्द येथील अल्पभूधारक शेतकरी होते. गावालगत गट क्रमांक १२४ मध्ये दीड एकर शेती होती. याच शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता.

ट्रॅक्टर चालवत असताना शेजारील नदीकाठी असलेल्या मोठ्या खड्ड्यात ट्रॅक्टर कोसळला. ट्रॅक्टरखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. खड्ड्यात सुमारे वीस फूट पावसाचे पाणी साचले होते. ट्रॅक्टर कोसळताना मोठा आवाज झाला. आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी हळहळ व्यक्त केली जात आहे. पंढरीनाथ चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande